चार मित्र
राहत होते एकत्र
होते जरासे विचित्र!
एकदा एक गम्मत झाली
एकाची मैत्रीण घरी यायची झाली
बाबापुता करुन त्याने इतरांना मनवले
त्यावेळी बाकिच्यांनी बाहेर जायचे ठरले
तंदुरी, बिर्य़ाणीवर मित्रांनी तडजोड केली
अशाप्रकारे मिटींग फ़िक्स झाली
घरभरचा पसारा
साफ़ केला सारा
प्रत्येक वस्तूला योग्य जागी पोचवले
घराला फ़ार छान सजवले
आणि ठरल्या वेळी ती आली
सर्व तयारी बघून ती सुखावली
त्याला काय बोलू आणि नको असे झाले
पढवलेले सगळॆ Dialogues ओठांतच राहिलॆ
हळुहळू त्याची भीती पळाली
त्याचवेळी मित्रांनी आपले रंग दाखवायला सुरवात केली
हळुहळू एक एक जण आत येऊ लागला
आणि आपली ओळख करुन देऊ लागला
इकडे त्याचा पारा वर वर चढू लागला
"बाहेर जा! बाहेर जा!" असे इशारे करू लागला.
पण मित्र काही ऎकेनात
मैत्रिणीशी बोलणे सोडेनात
तिच्या सर्व गंमत लक्षात आली
मुद्दामहून ती पण त्यांना सामील झाली
दोन कप कॉफ़िची पाच कप झाली
एकालाच मात्र ती कडू लागली
त्याने एक छोटीशी चूक केली होती.
भेटीची तारिख १ एप्रिल ठरवली होती.