Wednesday, November 6, 2013

कैडू - एक अफलातून मॉकटेल

Show Hindi Version       Show Marathi Version

कणकवलीच्या बोंडूच्या एकदा मनात आले
किती दिवस एकटेच ग्लासात उतरायाचे
आता त्याने मॉकटेल बनायचे ठरवले

सुयोग्य फळाचा शोध सुरु झाला
इंटरनेट वरुन धांडोळा घेतला जाऊ लागला

कोल्हापूरची मिरची, नागपूरची मोसंबी, जळगावची केळी, महाबळेश्वरची स्ट्रोबेरी
यांच्याशी चव जुळवायचा प्रयत्न केला
पण कधी रंग, कधी गुणधर्म तर कधी भौगोलिक परिस्थिती यात प्रयोग फसला

बोंडूचे मात्र एक पक्के होते
मनपसंद आणि पूरक फळ मिळाल्यावरच त्याला मॉकटेल बनायचे होते

तिकटे चिपळूणच्या कैरीचे पण तसेच होते
तिचेही मॉकटेलसाठी फळ शोधणे चालू होते

अचानक एकदा हा बोंडू तिच्या नजरेस पडला
काय वाटले तीला, तीने त्याला सांगावा धाडला

बोंडूला पण कैरी खूप आवडली
मॉकटेलसाठी हिच याची त्याला खात्री पटली

फळांच्या झाडांना सुद्धा ही जोडी ज्याम आवडली
आणि चिपळूणच्या आमराईतल्या बैठकित बात ठरली

4 नोव्हेंबरला दोघांनी मॉकटेलसाठी खूणगाठ बांधली आहे
आणि 27 एप्रिलला ह्या मॉकटेलचे झोकात लॉँचिंग आहे

आतापर्यंत जसे प्रेम, आशीर्वाद
बोंडू आणि कैरीला दिलेत तसे ह्या कैडूला पण द्यावे
अन् स्वत:ची स्वतंत्र चव जपूनही
एक मस्त अफलातून चव बननेले हे मॉकटेल तुमच्या पसंतीस उतरावे