अमृता,
येतोय तुला भेटायला,
पहाटेचे नाजुक दव
तशी तुझ्या ओठांची लव
ओठांवरील दव टिपायला
येतोय तुला भेटायला ...
बनवशील साखरभात प्रेमाने
भरवशील आपल्या हाताने
बोटांची लज्जत चाखायला
येतोय तुला भेटायला ...
असेल तुझ्या हातात हात
हळुवार झुळुक अन् तार्यांची साथ
एकमेकांना बिलगून चालायला
येतोय तुला भेटायला ...
येतोय तुला भेटायला,
पहाटेचे नाजुक दव
तशी तुझ्या ओठांची लव
ओठांवरील दव टिपायला
येतोय तुला भेटायला ...
बनवशील साखरभात प्रेमाने
भरवशील आपल्या हाताने
बोटांची लज्जत चाखायला
येतोय तुला भेटायला ...
असेल तुझ्या हातात हात
हळुवार झुळुक अन् तार्यांची साथ
एकमेकांना बिलगून चालायला
येतोय तुला भेटायला ...