तू नसताना सरता सरत नाहीत | क्षण |
क्षण पुरता पुरत नाहीत तू असताना | |
तू नसताना तुझ्या वाटेवरून हलत नाही | नजर |
नजर हलत नाही तुझ्यावरून तू असताना | |
तू नसताना आठवायचे तुला | मनात |
मनात साठवायचे तुला तू असताना | |
तू नसताना छळतो मला | चंद्र |
चंद्र जळतो तू असताना | |
तू नसताना येते | रितेपण |
रितेपण रितं होऊन जात तू असताना | |
खरच किती फरक पडतो बघ तू नसताना अन् असताना | |
असताना फारसे नाही | जाणवत |
जाणवतं क्षणोक्षणी तू नसताना | |
:-( नसताना | तू असताना :-) |