कॉटन ग्रीन स्टेशन होते
जायचे होते पनवेलला
घाईघाईने तिकिट काढून
प्लाटफॉर्मवर मी पोचलेला
गाडीने प्लाटफॉर्म सोडलेलाच
मी धावतपळत उडी मारून गाडीत चढलो
धापा टाकत, गाडी मिळाली या खुशीत
सीटवर विसावलो
लागला जरासा डोळा
थोड्यावेळाने बघतो तो काय
अरे ह्या तर माहिम,
माझ्या वाटेवरला स्टेशन नाय
आवशीक खाव म्हणत मी खाली उतरलो
वडाळ्याला मागे येउन पनवेलच्या गाडित बसलो
चडफडलो मनात
व्यर्थ गेली धावपळ
चुकीचीच गाडी पकडली
उगाच केली इतकी धावपळ
थोड्यावेळाने मला सुचले
आता जरी चुकीची गाडी पकडली तरी
ह्या पुढे माझी सुटणारी गाडी मी चुकवणार नाही
उडी कशी मारायची ह्या भीतीने मी
प्लाटफॉर्मवर राहणार नाही
ह्या विचाराने मी झालोय स्वस्थ
थंडगार हवा खात पनवेलकडे झालोय मार्गस्थ
Veda Por...
ReplyDeleteMastach re...
ReplyDeleteOhhh.. was it then??? sahi aahes re...
ReplyDelete