Monday, July 11, 2016

वारी

देवा विठ्ठला तुझ्या पडतो मी पाया
विटेवरी काया अन् माऊलीची माया ||ध्रु||

तुझ्या दर्शनाची होती लागलेली आस
प्रत्येक पावलात होता तुझाच ध्यास
केली नाही पर्वा, झाले कितीही सायास
आतुरले मन माझे तुझ्या दर्शनास ||1||

तुझ्या दर्शनाने झाले सारे क्लेश शांत
मिटल्या सर्व चिंता, नाही कशाचीच भ्रांत
आनंद दाटला माझिया मनात
माऊलीचे नाम अखंड मुखात ||2||



No comments:

Post a Comment