कधीकाळचं पुस्तकात ठेवलेल़ं गुलाबाच फूल
साफसफाई करताना बायकोच्या नजरेस पडलं
सफाई राहिली बाजूला
पुढचं महाभारत मला चेहऱ्यावर दिसलं
कावराबावरा होत म्हणालो
देतो पुस्तक गुलाबासकट आत्ताच
जराश्या रागानेच म्हणाली राहूदेत
सुरू व्हायच्या थांबलेल्या उचक्या उगाच
बघ बघ ते सुकलेलं फूल
अजूनही जपून ठेवलय
आठवतय का ह्या आधी
एखादं फूल माझ्यासाठी आणलयं
इशारा समजला मला
लगेच बागेतला ताजा गुलाब केसांत माळला
संध्याकाळी फिरायला गेलो तेव्हा
मुद्दाम गुलाबी ड्रेस भेट दिला
रात्री गुलकंदी पान खाताना
ती हसू दाबत म्हणाली
किती टरकली होती तुझी
मिळाली संधी तर जरा फिरकी घेतली
अरे हा गतकाळचा सुकलेला गुलाब
मी का आपला फुललेला ताटवा उधळू?
भूतकाळातील फक्त एक गोड आठवण
मी का स्वतःला घेऊ टोचून?
बायकोचा समजूतदारपणा बघून
जीव भांड्यात पडला
सुकलेल्या गुलाबाचा काटा
टोचता टोचता राहिला
आजदेखील ते पुस्तक गुलाबासहित कपाटात आहे
त्याच्यावरच आता गुलाबी ड्रेस ठेवलेला आहे
No comments:
Post a Comment